Bandra Incident: वांद्रे स्थानकावर लोकांच्या गर्दीमुळे हार्दिक पंड्या नाराज, हात जोडून 'त्या' कामगारांना दिला खास सल्ला
हार्दिक पंड्या (Photo Credits: Getty)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूची वाढती कहर लक्षात घेऊन मंगळवारी 3 मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला. पण मुंबईतल या लॉकडाउन (Lockdown) वाढीनंतर एक वेगळंच चित्र समोर आलं ज्यामुळे प्रत्येक माणसाची चिंता वाढली. मुंबईतील वांद्रे (Bandra) येथे परप्रांतीय मजुरांची अचानक गर्दी झाली. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हे दृश्य पाहून फार दु:खी झाला आणि ट्विट करुन लोकांना खास आवाहन केले. जमावाला आवरण्यासाठी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) लाठीचार्च करण्यात आला. त्यांना परत त्यांच्या घरी पाठविण्यात यावे अशी या कामगारांची मागणी होती. या घटनेने संपूर्ण देश अस्वस्थ झाला. अशा परिस्थितीत पंड्याने वांद्रेच्या वेस्ट स्टेशनवर जमा झालेल्या कामगारांचा व्हिडिओ ट्विटरवरुन सर्वांना खास आवाहन केले. “सगळ्यांनी घरात राहा आणि संयम राखा. असे केल्यानेच आपल्याला करोनावर मात करता येईल. साऱ्यांनी घरात राहू आणि एकत्रितपणे या संकटाचा सामना करू”, असं ट्विट त्याने केले. (Bandra Incident: वांद्रे स्थानकातील गर्दीचे प्रकरण आरोपी विनय दुबे याला भोवले, 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी)

पंड्या पूर्वी हभजन सिंहनेही ट्विट करुन आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला होता. भारतात कोरोना व्हायरस वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरस संक्रमणाची संख्या वाढून 11,933 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची 1,076 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आजवर देशात 392 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा वारंवार सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र लॉकडाउनचा फटका बसलेला कामगार वर्ग अजूनही आपल्या राज्यात परत जाण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल केंद्र सरकारला दोषी धरलं. कामगारांना सध्या निवारा आणि अन्नाची गरज नसून त्यांना आपल्या गावाला जायचं आहे, अशा आशायचे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी केले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे याला मंगळवारी रात्री अटक केली.