आशिया कप 2023 (Asia Cup 2023) चे जास्तीत जास्त सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत. या स्पर्धेचे तीन साखळी सामने आणि एक सुपर 4 सामना पाकिस्तानने आयोजित केला आहे, याशिवाय सर्व सामने श्रीलंकेत होत आहेत. दरम्यान, श्रीलंका क्रिकेटसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. बुधवारी समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूला लंका प्रीमियर लीगच्या 2020 आवृत्तीत फिक्सिंगच्या आरोपाखाली (Sri Lanka Cricketer Match Fixing) अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या माजी क्रिकेटपटूने बुधवारी स्वतः आत्मसमर्पण केले. (हे देखील वाचा: ICC ODI Rankings 2023: Asia Cup 2023 दरम्यान आयसीसीने जाहीर केली एकदिवसीय क्रमवारी, गिल-इशानचा फायद; शाहीनचा टॉप 5 मध्ये प्रवेश)
Former Sri Lanka spinner Sachithra Senanayake arrested over match-fixing accusations 👀#SachithraSenanayake #SriLanka #CricketTwitter pic.twitter.com/FsT3K2eHRc
— InsideSport (@InsideSportIND) September 6, 2023
कधी केले होते फिक्सिंग ?
मिळालेल्या माहितीनुसार, भ्रष्टाचार तपास युनिटने बुधवारी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायकेला अटक केली. सेनानायके स्वतः शरण गेला. तीन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने त्याच्या परदेशात जाण्यावरही बंदी घातली होती. सेनानायकेवर लंका प्रीमियर लीग 2020 मधील सामने फिक्स केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये त्याने दोन खेळाडूंना सामने फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केले, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. कोलंबोच्या चीफ मॅजिस्ट्रेट कोर्टाने इमिग्रेशन आणि कंट्रोलर जनरल ऑफ इमिग्रेशन यांना सेनानायकेवर तीन महिन्यांसाठी प्रवास बंदी घालण्याचे आदेश दिले. कोर्टाला सांगण्यात आले की अॅटर्नी जनरल विभागाला क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास युनिटने माजी ऑफस्पिनरवर फौजदारी आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले होते.
सचित्र सेनानायके यांची क्रिकेट कारकीर्द कशी होती?
उजव्या हाताचा ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाज सचित्र सेनानायके 2012 ते 2016 दरम्यान श्रीलंकेसाठी क्रिकेट खेळला. त्याने श्रीलंकेसाठी एक कसोटी, 49 एकदिवसीय आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 53 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25 विकेट्स आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तो फक्त एकच सामना खेळला आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून 8 सामने खेळले असून 9 विकेट्स घेतल्या आहेत.