सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांचे मित्र अवि कदम (Avi Kadam) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. सचिन तेंडुलकर यांनी स्वत: ट्ववीट करून ही माहिती दिली आहे. अवि कदम यांच्या निधानाची बातमीने क्रिडाविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अवि कदम यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निषन्न होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर अवि कदम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

‘माझा प्रिय मित्र अवि कदम याचे निधन झाले आहे. शाळेतल्या दिवसांपासून तो माझा जवळचा मित्र होता. क्रिकेटच्या सरावानंतर शिवाजी पार्काबाहेर आमची होणारी भेट माझ्या कायम स्मरणात राहील. त्याच्या नातेवाईंसोबत माझ्या सहवेदना आहेत.’ भावुक होत सचिनने अवि कदम यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. हे देखील वाचा- MS Dhoni 200th IPL Game: आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा महेंद्र सिंह धोनी ठरला पहिला खेळाडू

सचिन तेंडुलकर यांचे ट्विट-

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातला आहे. सर्वसामान्यांसह अनेक राजकीय नेते, कलाकार आणि खेळाडूदेखील कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान, अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे.