MS Dhoni of Chennai Super Kings. (Photo Credits: IANS)

[Poll ID="null" title="undefined"]आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 37 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज एकमेकांशी भिडले आहेत. या हंगामात चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी बजावता आली नाही. मात्र, राजस्थान विरुद्ध सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नावे नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. राजस्थान विरुद्ध सामन्यात महेंद्र सिंह धोनी हा आपला 200 वा सामना खेळत आहे. तसेच आयपीएलमध्ये 200 सामने खेळणार महेंद्र सिंह धोनी पहिला खेळाडू ठरला आहे. धोनी पाठोपाठ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा क्रमांक लागतो. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 197 सामने खेळले असून लवकरच तो 200 चा टप्पा गाठणार आहे.

आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2008 पासून महेंद्र सिंह धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आठ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापैकी चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या तीन किताब जिंकले आहेत. आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात चेन्नच्या संघाचा मुंबईच्या संघाकडून केवळ एका धावानी पराभव झाला होता. तसेच बंदीच्या कालावधीत धोनीने 2016 मध्ये पुणे सुपर जॉईंट संघाचे नेतृत्व केले होते. परंतु, 2017 मध्ये पुणे सुपर जॉईंटसंघाकडून खेळत असताना धोनीने कर्णधार पदाची जबाबदारी झटकली होती. त्यावेळी स्टीव्ह स्मिथ पुण्याच्या संघाचे नेतृत्व केले होते. हे देखील वाचा-CSK Vs RR, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्ज संघाने टॉस जिंकला; राजस्थान रॉयल्स करणार प्रथम गोलंदाजी

महेंद्र सिंह धोनीने आयपीएलमध्ये एकूण 4 हजार 568 धावा केल्या आहेत. त्यापैकी त्याने चैन्नईच्या संघासाठी 3 हजार 994 धावा केल्या आहेत. चेन्नईच्या संघाने आयपीएलमध्ये 102 विजय मिळवले आहेत. यापैकी महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने 169 सामन्यात विजय मिळवला आहे.