CSK Vs RR, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्ज संघाने टॉस जिंकला; राजस्थान रॉयल्स करणार प्रथम गोलंदाजी
एमएस धोनी (Photo Credit: Twitter/IPL)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 37 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) एकमेकांशी भिडणार आहे. शेख जायद (Shaikh Zayed Stadium) स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामातील निम्मी स्पर्धा संपली असून आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. या हंगामात दोन्ही संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ सातव्या , तर राजस्थानचा संघ आठव्या क्रमांकावर आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- Pravin Dubey Quick Facts: दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याच्या जागी प्रविण दुबे याला संधी; किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सामन्यात करणार आयपीएलमध्ये पदार्पण

चेन्नई सुपर किंग्ज:

एमएस धोनी (कर्णधार), एम विजय, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगीडी, दीपक चहर, पियुष चावला, इम्रान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, सॅम करण, एन जगदीसन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतूराज गायकवाड, कर्ण शर्मा

राजस्थान रॉयल्स:

जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अॅन्ड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमरर, ओशान थॉमस, रियान पराग, यशस्वा जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंग, वरुण आरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी, जोफ्रा आर्चर