AUS vs NZ, Women's T20 World Cup 2020 Live Streaming: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड महिला टी-20 वर्ल्ड कप लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports वर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड महिला टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Twitter/ICC)

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (ICC Women's T20 Word Cup) सेमीफायनलमधील अंतिम स्थान निश्चित करण्यासाठी आज ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) महिला संघ आमने-सामने येणार आहेत. मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल (Junction Oval) मैदानात हा सामना खेळला जाईल. यापूर्वी भारत (India) , दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघांनी महिला टी-20 विश्वचषकच्या सेमीफायनलमधील स्थान निश्चित केले आहे. हा सामना अ गटातील दुसऱ्या स्थानासाठी खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने अ गटातील 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकून 4 गुण मिळवले आहे. दोंघांचे गुण समान असले तरी ऑस्ट्रेलिया रन-रेटने पुढे आहे. या गटात भारताने सर्व 4 सामने जिंकून 8 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील विजेता संघ 5 मार्च रोजी होणाऱ्या टी-20 विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये या तीन संघांशी जडेल. (Women's T20 World Cup 2020: भारतासह तीन संघ सेमीफायनलमध्ये, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यानंतर ठरणार अंतिम टीम)

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड महिला टी-20 विश्वचषक सामना गुरुवार, 2 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता होईल. टॉस सकाळी 9.00 वाजता होईल. हा सामना मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शनवर पाहिले जाऊ शकते. या सामन्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग भारतात हॉटस्टारवर पहिले जाऊ शकते.

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध 17 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. अटीतटीच्या सामन्यात भारताने प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. दुसरीकडे, न्यूझीलंडने श्रीलंकाविरुद्ध विजयी सलामी दिली मात्र पुढील सामन्यात भारताविरुद्ध फक्त 3 धावांनी पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघ विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याने बॅट आणि बॉलने दोंघांमध्ये थरारक सामना प्रेक्षांना नक्की पाहायला मिळेल.

असा आहे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड महिला संघ

ऑस्ट्रेलिया: एरिन बर्न्स, निकोला केरी, एशले गार्डनर,राचेल हेन्स (उपकर्णधार), एलिसा हीली (विकेटकीपर), जेस जोनासेन, डेलिसा किमिन्स, मेग लॅनिंग (कॅप्टन), सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिसे पेरी,मेगन शुट, अ‍ॅनाबेल सदरलँड, टेयला व्लेमिंक, जॉर्जिया व्हेरहॅम.

न्यूझीलंड: सोफी डिवाइन (कॅप्टन), रोजमेरी मेयर, अमेलिया केर, सूजी बेट्स, लॉरेन डाउन, मैडी ग्रीन, होली हडलस्टन, हेले जेन्सेन, लीग कास्पेरेक, जेस केर, केटी मार्टिन (विकेटकीपर), केटी पर्किन्स, अन्ना पीटरसन, रेचेल प्रीस्ट, ली ताहुहु.