Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: मोहम्मद सिराजसमोर शतकवीर ट्रॅव्हिस हेडने टाकली नांगी, DSP ने दिला शानदार सेंड ऑफ
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडविरुद्ध जबरदस्त उत्साह आणि आक्रमकता दाखवली. ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान सिराजने 82व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
The end of a sensational innings! 🗣️#AUSvIND pic.twitter.com/kEIlHmgNwT
— cricket.com.au (@cricketcomau) December 7, 2024
मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील हा संघर्ष सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सिराजची आक्रमक शैली आणि हेडशी झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर स्टेडियममध्ये बसलेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजवर ‘बू...बू...’ ओरडायला सुरुवात केली. हे पाहून सिराजनेही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना हातवारे करत सडेतोड उत्तर दिले.
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2024 04:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

