IND vs AUS (Photo Credit - X)

India National Cricket team vs Australia National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (IND vs AUS) दुसरा सामना 06 डिसेंबर (शुक्रवार) पासून ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान, प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियने 10 विकेट गमावून 337 धावा केल्या आहे. यासह त्यांनी भारताविरुद्ध 157 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 140 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर भारताकडून सिराज आणि बुमराहने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या.

बुमराह-सिराजचा कहर

ट्रॅव्हिस हेडशिवाय मार्नस लॅबुशेनने 64 धावा केल्या. दुसरीकडे जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याशिवाय आर अश्विन आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (हे देखील वाचा: NZ vs ENG, 2nd Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडने 533 धावांची घेतली आघाडी, जेकब बेथेल आणि बेन डकेट यांची शतके हुकली; येथे स्कोअरकार्ड पाहा)

पहिल्या डावात भारताची निराशाजनक सुरुवात

पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी मिळून डाव सांभाळला. पहिल्या डावात संपूर्ण भारतीय संघ 44.1 षटकात 180 धावांवरच मर्यादित राहिला. युवा अष्टपैलू नितीश रेड्डीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. नितीश रेड्डीशिवाय केएल राहुलने 37 धावा केल्या.

मिचेल स्टार्कने घेतल्या सहा विकेट

दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. मिचेल स्टार्कशिवाय स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम इंडिया या सामन्यात पुनरागमन करू इच्छित आहे.