Josh Inglish (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs England National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चौथा सामना ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला गेला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करत आहे. तर, इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5 विकेट राखुन स्पर्धेत शानदार विजयाने सुरुवात केली आहे. यासह, ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम रचला आहे. इंग्लंडने कांगारूंसमोर 352 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंड संघाने 15 चेंडू शिल्लक असताना ऐतिहासिक विजय नोंदवला.

तत्तपुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम 351 धावा केल्या होत्या, ज्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील हा सर्वोच्च धावसंख्या ठरला. पण इंग्लंड संघ काही तासांसाठी या विक्रमाचा हक्कदार राहिला कारण ऑस्ट्रेलियन संघाने 48 व्या षटकात हे विक्रमी लक्ष्य गाठले. यापूर्वी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता, ज्याने 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले होते.

सामन्यात 2 शतके आणि 3 अर्धशतके

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यात एकूण 2 शतके आणि 3 अर्धशतके झाली. त्याआधी, बेन डकेटने 165 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली आणि इंग्लंडला 351 धावा करण्यास मदत केली. बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला आहे. इंग्लिश संघाकडून जो रूटनेही 68 धावांची खेळी केली.

दुसरीकडे, जेव्हा ऑस्ट्रेलिया 352 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा जोश इंग्लिश संघासाठी तारणहार ठरला. इंग्लिशने नाबाद 120 धावा केल्या आणि त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियासाठी दोन खेळाडूंनी अर्धशतकेही केली. मॅथ्यू शॉर्टने 63 धावांचे योगदान दिले आणि अ‍ॅलेक्स कॅरीनेही 69 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात ग्लेन मॅक्सवेलनेही मोठे योगदान दिले, त्याने 15 चेंडूत 32 धावांची छोटीशी खेळी केली.