डेविड वॉर्नर याला किंग कोहली याच्यासोबत डिनर करण्याची इच्छा, विराट ऐकतोस ना?, पाहा Video
डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty Images)

2014 मध्ये भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) टीममध्येकसोटी मालिका खेळली जात होती. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यात मैदानावर मोठा वाद पाहायला मिळाला. पण आता दोन्ही खेळाडूंमधील संबंध सुधारले हे आणि वॉर्नरला आता भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराटसमवेत डिनर करण्याची इच्छा आहे. दिग्गज फलंदाज आणि भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या कोहली आणि वॉर्नरमधील संबंध खूप चांगले झाले आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांची क्लास घेणारा वॉर्नर टीम इंडियाचा कर्णधार कोहलीकडून डिनरच्या आमंत्रणाची प्रतीक्षा करत आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांना दिलेल्या मुलाखतीत वॉर्नरने सांगितले की त्याने कोहलीच्या कॉलची वाट पाहत आपला फोन जवळ ठेवला आहे. तथापि, ऑस्ट्रेलियाच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान विराट त्याची विनंती मान्य करतो की नाही हे पाहणे बाकी आहे. वॉर्नर म्हणाला, "मी खरोखरच या प्रतीक्षेत आहे आणि विराटने मला डिनरमध्ये आमंत्रित केले आहे याची वाट पाहत आहे," वॉर्नर म्हणाला. (Video: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात विकेट न मिळाल्याने हताश विराट कोहली याने अंपायरसह घातला वाद)

वॉर्नरने एका व्हिडिओमध्ये विराटच्या नात्यासंबंधी मोठे विधान केले आहे. सनरायझर्स हैदराबादने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आक्रमक फलंदाजाने असे म्हटले की, "भारतात परत येऊन पुन्हा खेळण्यासाठी खूप उत्साही आहे. मला येथे काही काळ वनडे क्रिकेट खेळता आले नाही. आमच्या संघाने येथे शेवटची मालिका खेळली. मी त्याला टीव्हीवर पाहिले, त्याच मालिकेनंतर आम्ही परतलो. येथे परत येऊन वनडे क्रिकेट खेळणे खूप विशेष ठरेल. इथले चाहते खूप चांगले आहेत. येथे खेळणे म्हणजे आमच्या घरात खेळण्यासारखे आहे." याशिवाय, आपली मुलगी आणि विराट यांच्यातील जोडविषयी बोलताना वॉर्नरने म्हटले, "काही कारणास्तव ती टीव्हीवर विराटला खेळताना पहात होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तिला कोहलीप्रमाणे खेळायचे होते. तिने मला खेळताना आणि बऱ्याच लोकांना पहिले परंतु ती म्हणाली की मला एक विराट व्हायचे आहे."

मालिकेच्या सुरुवातीच्या वॉर्नरने केलेल्या चमकदार कामगिरीनंतर त्याच्यापासून भारत सावध असेल. शुक्रवारी राजकोट स्टेडियममध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय आव्हानासाठी तो सज्ज असेल. भारत आणि ऑस्ट्रेलियायामधील अंतिम वनडे सामना रविवारी बेंगळुरू येथे खेळला जाईल.