Video: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात विकेट न मिळाल्याने हताश विराट कोहली याने अंपायरसह घातला वाद
विराट कोहलीने अंपायरशी घातला वाद (Photo Credit: Twitter)

विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला (Indian Team) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात असा पराभव पत्करावा लागला आहे की कोणताही भारतीय खेळाडू किंवा त्याच्या चाहता लक्षात ठेवू इच्छित नसेल. सध्या टीम इंडियाला सर्वात मजबूत बॉलिंग युनिट म्हटले जाते,या पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात टीम इंडियाच्या या गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही. भारताने मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील पहिल्या सामन्यात दिलेल्या 255 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावत गाठले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांना बर्याच वेळा बाद करण्याचा प्रयत्न केला पण त्यापैकी एकालाही यश मिळाले नाही. सामन्यादरम्यान एक क्षण आला जेव्हा कर्णधार कोहली विकेटसाठी इतका हताश झाला की त्याने अंपायरशी वाद घालण्यास सुरवात केली. (IND vs AUS 1st ODI: डेविड वॉर्नर-आरोन फिंच यांनी उडवला भारताचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाचा 10 विकेटने विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला, यामंडे भारताला लज्जास्पद पराभवाचा सामोरे जावे लागले. कुलदीप यंदा याच्या ओव्हरमध्ये विराटने अंपायरशी वाद घातला.कुलदीपने 21 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर फिंचविरोधातएलबीडब्ल्यू अपील एम्पर शमशुद्दीनने नकारले. अंपायरच्या निर्णयाने आश्चर्यचकित झाल्याने विराट त्यांच्याकडे गेला आणि अपील का नाकारले असे विचारले. अंपायरने जेव्हा स्पष्टीकरण दिले तेव्हा कोहलीने त्याचे डोकं धरले आणि हसायला लागला. फिंच आऊट झाल्याचे कोहलीला वाटले. पाहा व्हिडिओ:

भारतीय क्रिकेट संघाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अनेक ऐतिहासिक कामगिरी केली आहेत. 2011 मध्ये विश्वचषक जिंकण्याची कामगिरी भारताने ज्या मैदानावर कामगिरी बजावली त्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाने असा खेळ केला कि भारताला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिले भारताला 255 धावांवर ऑलआऊट केले, त्यानंतर लक्ष्य कोणतीही विकेट न गमावता 10 विकेट ने सामना जिंकला.