पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळला जात आहे. सामन्याच्या तिसर्या दिवशी पाकिस्तानी फिरकीपटू यासिर शहा (Yasir Shah) याने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा कसोटी फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याची विकेट घेतली. यासीरने कसोटी सामन्यात स्मिथला बाद करण्याची ही सातवी वेळ होती. 10 बॉल खेळल्यानंतर स्मिथने फक्त चार धावा केल्या आणि यासिरच्या शानदार चेंडूवर बोल्ड झाल्यावर पॅव्हिलिअनमध्ये परतला. स्मिथला बोल्ड करत यासिरने त्याच्या कसोटीतील सर्वात वेगवान 7000 धावांचा 27 धावा करण्याच्या हेतूवर पाणी फेरले. स्मिथला टेस्ट कारकिर्दीत 7000 धावा पूर्ण करण्यासाठी 27 धावांची गरज होती, पण या मॅचमध्ये तो केवळ 4 धावा करू शकला. पहिल्या डावात पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ 240 धावांवर ऑल आऊट झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लबूशेने यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेता आली. वॉर्नर आणि लबूशेने या दोन्ही फलंदाजांनी 222 धावांची भागीदारी केली. (Watch Video: मोहम्मद रिझवान याच्या Scent च्या सुगंधामुळे प्रफुल्लीत झाला टिम पेन, गब्बा टेस्ट खेळत स्लेजिंगद्वारे दिली कॉम्प्लिमेंट)
दरम्यान, स्मिथला बाद केल्यावर यासिरने त्याची विकेट शानदार पद्धतीने साजरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथला किती वेळा त्याने बाद केले याची नोंद करण्यासाठी शाहने बोटाने सात आकडा दाखवणाऱ्या शैलीत विकेट साजरी केली. यासिर विकेट साजरा करण्याचा हा मार्ग चांगलाच आक्षेपार्ह ठरला. स्मिथच्या विकेटनंतर संघाच्या सर्व खेळाडूंनी त्याला घेरले आणि त्याच्या या यशाचा आनंद साजरा केला. पाहा हा व्हिडिओ:
Yasir Shah has now dismissed Steve Smith seven times in Test cricket - and knows it! #AUSvPAK pic.twitter.com/ykTqg1imIS
— cricket.com.au (@cricketcomau) November 23, 2019
यासिरची ही दुसरी विकेट होती. यापूर्वी त्याने दुसर्या दिवशी 97 धावांवर जो बर्न्स याला बाद केले होते. दुसऱ्या डावात दलंदाजी करत ऑस्ट्रेलियाई गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाच्या मुश्किलीत चांगलीच वाढ केली आहे. पाकिस्तान ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 292 धावा पिछाडीवर आहे, शिवाय त्यांनी 3 विकेटही गमावली आहेत.