ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पाकिस्तान (Pakistan) संघातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गब्बा (Gabba) क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या मॅचच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानी संघ 240 धावांवर ऑल आऊट झाला. पाकिस्तान टेस्ट संघाचा नवीन कर्णधार अझहर अली याने पहिल्या सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याहा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine) याने मागील वर्षा अखेरीस भारतविरुद्ध मालिकेदरम्यान फलंदाजांना स्लेजिंगने भरपूर त्रास दिला होता. आणि आता पाकिस्तानविरुद्ध गाबा टेस्टदरम्यानही त्याने त्याची ही कामगिरी सुरुवात ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले आणि पाकिस्तानच्या फलंदाजांना जास्तवेळ क्रीजवर टिकू दिले नाही. यादरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पेन पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याच्यासोबत स्लेजिंग करताना दिसत आहे. (AUS vs PAK 1st Test: पॅट कमिन्स याचा चेंडू वैध की अवैध? मोहम्मद रिझवान याला नो बॉलवर बाद दिल्याने यूजर्सने थर्ड अंपायरवर केली टीका)
2017 मध्ये कसोटीच्या मैदानात पुनरागमन केल्यापासून पेनने त्याच्या विनोदी स्लेजिंगने सर्वांचे लक्ष वेधले आहेत. रिझवान जेव्हा क्रीजवर आला तेव्हा पाकिस्तानची स्थिती खराब होती. पाकिस्तानने 94 धावांवर 5 गडी गमावले होते. रिझवानसमोर मोठा स्कोर करण्याचे आव्हान होते. रिझवानने क्रीजवर पाय टाकताच पेनने त्याच्यावर तोंडी हल्ला सुरू केला. नॅथन लियोन ओव्हर टाकत असताना तो त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या मार्नस लाबुशेन याला असे म्हणताना दिसला, "सरफराजने या चेंडूंवर स्वीप शॉट्स मारत सरळ चार धावांसाथ एक चौकार मारला असता." पुढच्या चेंडूवर रिझवानने जोरदार शॉट मारला, पण त्याला एकही धाव मिळू शकली नाही. पेनने लाबुशेनला म्हण्टले 'त्याला खूप छान वास येत आहे." पाहा पेनच्या या स्लेजिंगचा हा मजेदार व्हिडिओ:
"He smells very nice."
Tim Paine was impressed with Muhammad Rizwan's scent upon his arrival at the crease 😅#AUSvPAK pic.twitter.com/DMHYDEm2Pl
— cricket.com.au (@cricketcomau) November 21, 2019
पाकिस्तानसाठी रिझवानने 37 धावा केल्या. तो ज्याप्रकारे बाद झाला त्याच्यावरून मोठा वाद निर्माण झाला. पॅट कमिन्स याच्या चेंडूवर रिझवान कॅच आऊट झाला. फिल्ड अंपायरने जेव्हा थर्ड अंपायरकडे अंतिम निर्णय पाठवला तेव्हा त्यांनीही रिझवान बाद सांगितले. त्यांच्या मते चेंडू वैध होता. कमिन्सचा पाय ओळीच्या आत होता. पण, रिप्ले पाहिला तेव्हा यूजर्स आश्चर्यचकित झाले. दिग्गजांनी या चेंडूला नो बॉल म्हटले आणि अंपायरचा निर्णय चुकीचा असल्याचे सोशल मीडियाद्वारे म्हटले.