रिद्धिमान साहाची (Wriddhiman Saha) गणना जगातील अव्वल विकेटकीपरमध्ये केली जाते. हे त्याने पुन्हा एकदा सिडनी कसोटीत सिद्ध केले आहे. साहा सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. परंतु रिषभ पंतच्या दुखापतीनंतर त्याला पर्याय खेळाडून म्हणून खेळवण्यात आले होते. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) आणि स्मिथ या जोडीने दमदार खेळी केली. परंतु, साहाने अप्रतिम कॅच टिपत लाबूशेनला माघारी धाडले. रिद्धिमान साहाने घेतलेल्या या अप्रतिम कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पहिल्या डावात 94 धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावातदेखील दमदार खेळ केला. चौथ्या दिवशी पहिल्याच सत्रात लाबूशेन आणि स्मिथ जोडीने आपली अर्धशतके पूर्ण केली. पण दुर्दैवाने दोघांनाही आपले शतक पूर्ण करता आले नाही. लाबूशेन 73 तर, स्मिथ 81 धावावर बाद झाला. दरम्यान, नवदीप सैनी याच्या गोलंदाजीवर लेग साईडला जाणाऱ्या चेंडूला लाबूशेनने टोलवण्याचा प्रयत्न केला. चेंडू लाबूशेनच्या ग्लोव्ह्जला लागला आणि चेंडूचा मार्ग थोडा बदलला गेला. मात्र, त्यावेळी रिद्धिमान साहाने सुपरमॅनसारखी उडी मारून लाबूशेनला माघारी धाडले. रिद्धिमान साहाने घेतलेल्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरला झाला असून अनेकांनी साहाच्या विकेटकिपिंगचे कौतूक केले आहे. हे देखील वाचा- IND vs AUS 3rd Test Day 4: रोहित शर्माच्या अर्धशतकामुळे चौथ्या दिवसाखेर भारताच्या 98 धावा, पण टीम इंडियाला विजयासाठी 309 धावांची गरच
ट्वीट-
Excellent catch by #Saha #SydneyTest #INDvAUS #AUSvIND pic.twitter.com/GhRigMLn97
— Abdur (@abdur_rahyman) January 10, 2021
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली होती. यामुळे तिसऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.