IND vs AUS 3rd Test Day 4: भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील सिडनी टेस्टच्या (Sydney Test) चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने 321/6 धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला आणि टीम इंडियापुढे (Team India) 407 धावंच तगडं आव्हान ठेवलं. दिवसाखेर टीम इंडियाने ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 98 धावा केल्या आहेत आणि आता सामन्याच्या अंतिम दिवशी त्यांना विजयासाठी 309 धावांची गरज आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) 52 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा नाबाद 9 धावा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद 4 धावा करून परतले. चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या कांगारू संघाला टीम इंडियाच्या गचाळ फिल्डिंगला फायदा झाला भारतीय खेळाडू तीन महत्त्वपूर्ण झेल पकडण्यात अपयशी परिणाम यजमान संघाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत संघाला चारशेहून अधिक धावांची आघाडी मिळवून दिली. कॅमरुन ग्रीनने सर्वाधिक 84 तर स्टिव्ह स्मिथने 81 धावा आणि मार्नस लाबूशेनने 73 धावांची खेळी केली. दुसरीकडे, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी संघाला दिवसाखेर प्रत्येकी विकेट मिळवून दिली. (IND vs AUS 3rd Test: कसं व्हायचं यांचं! रोहित शर्मा, हनुमा विहारी यांनी सोडले सोपे कॅच, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दिले जीवदान, पहा Video)
यजमान ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून फलंदाजी करत पहिल्या डावात 338 धावा केल्या आणि गोलंदाजांनी भेदक मारा करत भारतीय डाव 244 धावांवर गुंडाळला. अशाप्रकारे, कांगारू संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 94 धवनची आघाडी घेतली आणि चौथ्या तीन ग्रीन, स्मिथ आणि लाबूशेनच्या आक्रमक फलंदाजीनंतर ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला विजयासाठी 407 धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात रोहित आणि शुभमनने सलग दुसऱ्यांदा मालिकेत अर्धशतकी भागीदारी केली. या दरम्यान, कांगारू गोलंदाज जोडी फोडण्याचा प्रयत्न करत राहिले आणि अखेर हेझलवूडने शुभमनला विकेटच्या मागे टिम पेनकडे झेलबाद करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. शुभमन 64 चेंडूत 31 धावा केल्या. या खेळीत शुभमनने चार चौकार देखील खेचले. यानंतर दिवसाखेर रोहित चेंडूत धावा करून नाबाद परतला. रोहितने आपल्या खेळीत दिवसाखेर 4 चौकार आणि एक षटकार मारला आहे.
यापूर्वी, भारताकडून पहिल्या डावात शुभमन आणि पुजाराने प्रत्येकी 50 धावा केल्या होत्या. पॅट कमिन्सचा चेंडू कोपऱ्याला लागल्यानंतर रिषभ पंत फलंदाजी करताना अस्वस्थ दिसत होता. या दरम्यान, हेझलवूडचा चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून स्लिपमध्ये डेविड वॉर्नरच्या हातात गेला. पंत 36 धावा करून परतला. पंत पाठोपाठ रवींद्र जडेजा देखील दुखापतग्रस्त झाला आणि अखेर 28 धावा करून नाबाद परतला.