IND vs AUS 3rd Test: रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी कसोटीच्या (Sydney Test) चौथ्या दिवसी जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) नशीब त्याला अजिबात साठी देत नसल्याचे दिसत आहे. मेलबर्न कसोटीतील दमदार विजयानंतर सिडनी टेस्टमध्ये आघाडी घेण्याची टीम इंडियाने (Team India) संधी गमावली. खेळाडूंची गचाळ फिल्डिंग पुन्हा एकदा संघाला महागात पडताना दिसत आहे. दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर हनुमा विहारीने (Hanuma Vihari) बुमराहच्या गोलंदाजीला स्क्वेअर लेगवर मार्नस लाबूशेनचा (Marnus Labuschagne) सोपा झेल सोडत कॅच सोडण्याचे सत्र सुरु झाले. विहारीनंतर बुमराहच्या चेंडूवर आणखी दोन सोपे कॅच खेळाडूंनी सोडले ज्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील भर घातली. दुसऱ्या सत्रात बुमराहचा चेंडू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनच्या बॅटच्या कडेला लागून मागील बाजूस हवेत उडाला, परंतु रोहित पहिल्या स्लिपमध्ये चेंडूवर धरु शकला नाही.झेल पकडू शकला नाही. (IND vs AUS 3rd Test Day 4: सिडनी टेस्टवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व, तिसऱ्या कसोटी टीम इंडियापुढे डोंगराएवढं 407 धावांचे लक्ष्य)
सिडनीमध्ये चौथ्या दिवशी कांगारू संघाने 2 बाद 103 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि दिवसाच्या दुसऱ्या चेंडूवर विहारीने लाबूशेनचा कॅच सोडला. लाबूशेन त्यावेळी 47 धावांवर फलंदाजी करत होता आणि अखेर 73 धावांवर नवदीप सैनीने त्याला विकेटच्या मागे रिद्धिमान साहाकडे कॅच आऊट करत माघारी धाडलं. दुखापतग्रस्त रिषभ पंतच्या जागी विकेटकिपिंग करणाऱ्या साहाने त्यानंतर मॅथ्यू वेडचा जबरदस्त कॅच पकडला. साहाच्या या झेलचे सोशल मीडियावर यूजर्सकडून कौतुक केले जात आहे. दरम्यान, टीम इंडियाचे गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. चौथ्या दिवसाच्या चहाच्या वेळेपर्यंत संघात 6 बाद 312 धावांपर्यंत मजल मारली आणि दुसरा डाव घोषित करत टीम इंडियापुढे 407 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. पहा हनुमा विहारीचा ड्रॉप कॅच:
Second ball of the day and Labuschagne gets a life!
Live #AUSvIND: https://t.co/KwwZDwbdzO pic.twitter.com/1arOlWgBjf
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2021
75व्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने स्लिपमध्ये झेल सोडला.
#INDvsAUS @BCCI @imVkohli @ImRo45 @bhogleharsha Rohit Sharma joins the party as India drops 10th catch in the 3rd match pic.twitter.com/tgjskupxt5
— stacio cardozo (@StacioCardozo) January 10, 2021
दुसरीकडे, चौथ्या दिवशी चहाच्या वेळेत ऑस्ट्रेलियन संघाच्या दुसऱ्या डावात कॅमरुन ग्रीनने सर्वाधिक सर्वाधिक 84 तर पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या स्टिव्ह स्मिथने 81 धावा केल्या. मार्नस लाबूशेन पुन्हा एकदा शतकी धावसंख्या गाठण्यास अपयशी ठरला आणि 73 धावांवर सैनीला त्याला माघारी धाडलं. कर्णधार टिम पेन नाबाद 39 धावा करून परतला.