काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने (Pakistan) आपल्या देशात आशिया चषक (Asia Cup) आयोजित करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पाकिस्तानच्या या निर्णयानंतर सर्वांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला होता की या वेळी ही स्पर्धा कुठे होणार? बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आता हे स्पष्ट केले आहे की यंदाचे आशिया चषक दुबईमध्ये होणार असून यामध्ये भारत (India) आणि पाकिस्तान या दोन्ही संघ सहभागी होतील. यापूर्वी पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले होते, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. भारतीय क्रिकेट बोर्डाने त्यामागील सुरक्षेची कारणे दिली. ज्यानंतर ही स्पर्धा दुबईमध्ये घेण्याचे ठरले. ही स्पर्धा यंदा सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाईल. (Asia Cup 2020: पाकिस्तानमध्ये टीम इंडियाच्या आशिया कप स्पर्धेत खेळण्याबद्दल BCCI ने केले मोठे विधान, वाचा सविस्तर)
एशियन क्रिकेट कौन्सिलची (एसीसी) बैठक 3 मार्च रोजी होईल, परंतु त्याआधी गांगुली म्हणाले की, आशिया चषक दुबईमध्ये होणार असून भारत आणि पाकिस्तान यात सहभागी होतील. पाकिस्तानने या स्पर्धेचे आयोजन करण्यास कोणतीही अडचण नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांत एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. 2012-13 नंतर दोन्ही देशांनी एकही द्विपक्षीय मालिका खेळली नाही. त्यावेळी पाकिस्तान टीम भारत दौऱ्यावर आली होती. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे हे दोन देश केवळ आयसीसी (ICC) स्पर्धेत एकमेकांविरूद्ध खेळताना दिसत आहेत. आयसीसीच्या स्पर्धांच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाक क्रिकेट सामन्याचा रोमांच पाहायला मिळेल.
गांगुलीने टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केल्याबद्दल हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले. भारताने गुरुवारी न्यूझीलंडला 4 धावांनी पराभूत करून स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदविला आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले, "ते उत्तम क्रिकेट खेळत आहेत आणि सेमीफायनल स्थान निश्चित केले . या विश्वचषकात एकही संघ विजेतेपदाचा दावेदार नाही.