पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेचे आयोजन करण्यास काही हरकत नाही, पण भारतीय संघ (Indian Team) या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने असे म्हटले आहे की एशिया कपचे आयोजन तटस्थ ठिकाणी व्हावे कारण यंदा पाकिस्तानमध्ये जाण्याचा पर्याय नाही. काही दिवसांपूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) म्हणले होते की जर भारत आशिया कप स्पर्धेतला पाकिस्तानात आले नाही तर ते पुढील वर्षी, 2021 मध्ये भारतात आयोजित केले जाणाऱ्या टी-20 विश्वचषकसाठी संघ भारतात पाठवणार नाही. आणि आता बीसीसीआयने भारत पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा आशिया चषक यावर्षी होणार आहे. (2021 टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार घालण्याबाबत PCB चा घुमजाव, मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान फेटाळलून लावले वृत्त)
आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आयोजन करण्याच्या अधिकाराचा हं मुद्दा नाही, पण तटस्थ जागा निवडण्याची ही बाब आहे, कारण टी-20 स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. अधिकारी म्हणाले, "पीसीबी आयोजन करीत आहे की नाही हा प्रश्न नाही. स्पर्धेच्या ठिकाणाचा मुद्दा आहे. सध्या अशा गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत की आपल्याला तटस्थ स्थळाची आवश्यकता आहे. बहुराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारत पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही. आशिया चषक भारतविना होऊ तर एशियन क्रिकेट कौन्सिलला (एसीसी) आनंद असेल तर ही वेगळी गोष्ट आहे. भारताला आशिया चषकात सहभागी व्हायचे असेल तर ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये न होणे महत्त्वाचे आहे."
आशिया चषक 2018 मध्ये भारतात होणार होता, परंतु पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसाची समस्या होत असल्याने आशिया चषक संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे झाला आणि त्याचे आयोजन बीसीसीआयने केले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले की पीसीबीही असे करू शकते. 2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट टीमच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, त्यानंतर 10 वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन केले गेले नव्हते. मात्र अलीकडेच श्रीलंकेने पाकिस्तानचा दौरा केला होता आणि सध्या बांग्लादेशही पाकच्या दौर्यावर आहे.