अक्षर पटेल (photo: Getty)

एशिया चषक २०१८साठी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडियात मोठे फेरबदल पहायला मिळत आहेत. यातील ३ बदल महत्त्वपूर्ण आहेत. संघ व्यवस्थापनाने हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर, त्या ठिकाणी तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. कोण आहेत ते चेहरे?

हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शार्दुक ठाकूर यांच्या ठिकाणी दीपक चाहर, रविंद्र जडेजा आणि सिद्धार्थ कौल यांना संधी मिळाली आहे. फेरबदल केलेल्या संघाचा पहिलाच सामना बांगलादेशसोबत होणार आहे. दरम्यान, पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यावेळी हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या ऐवजी आता दीपक चाहरला दुबईला पाठविण्यात आले आहे. शिवाय अक्षरच्या आंगठ्यााल जोरदार मार लागल्यामुळे तोही संघाबाहेर गेल्याचे वृत्त आहे.

बांगलादेशच्या संघाचा विचार करता हा संघ आता चांगलाच सरावला आहे. त्यामुळे बांग्लादेशसोबत खेळताना टीम इंडियाला काहीसे सबूरीनेच घ्यावे लागणार आहे.