Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024 Day 3 Stumps Scorecard: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 12 ऑक्टोबरपासून मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 101 षटकांत तीन गडी गमावून 492 धावा केल्या आहे. इंग्लंडकडून अनुभवी फलंदाज जो रूटने सर्वाधिक 176 धावा केल्या आहेत. या शानदार खेळीदरम्यान जो रूटने 277 चेंडूत 12 चौकार लगावले. जो रूट 176 नाबाद आणि हॅरी ब्रूक 141 नाबाद रन्ससह खेळत आहे. इंग्लंडचा संघ अजूनही पाकिस्तानपेक्षा 64 धावांनी मागे आहे. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि आमेर जमाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Root and Brook score unbeaten tons to close in on Pakistan, as bat continued to dominate ball on Day 3 in Multanhttps://t.co/jamBKcZQ6G | #PAKvENG pic.twitter.com/s369y0616p
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 9, 2024
हे देखील वाचा: Joe Root Stats And Record: पाकिस्तानविरुद्ध 'जो रूट'ची शतकी खेळी ठरली ऐतिहासिक; दिग्गज खेळाडूंचाही विक्रम मोडला
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 149 षटकात 10 विकेट गमावून 556 धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीक, शान मसूद आणि आगा सलमान यांनी शतकी खेळी खेळली. पाकिस्तानसाठी कर्णधार शान मसूदने 151 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली.
इंग्लंडकडून स्टार गोलंदाज जॅक लीचने सर्वाधिक तीन बळी घेतले. जॅक लीचशिवाय गस ऍटकिन्सन आणि ब्रेडन कार्सने प्रत्येकी 2 बळी घेतले. त्याचबरोबर ख्रिस वोक्स, शोएब बशीर, जो रूट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला आहे.