IND vs AFG 2nd T20: दुसऱ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्मा इतिहास रचणार, करणार असा अनोखा पराक्रम
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवार, 11 जानेवारी रोजी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी म्हणजेच 14 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच कर्णधार रोहित शर्मा आपल्या नावावर अनोखा विक्रम नोंदवेल. रोहित शर्माचा हा 150 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. या अनोख्या विक्रमाला स्पर्श करणारा रोहित शर्मा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे. (हे देखील वाचा: Ravindra Jadeja Visits Ashapura Temple: अष्टपैलू रवींद्र जडेजा पत्नीसह दर्शनासाठी पोहचला कच्छच्या माँ आशापुरा मंदिरात, पाहा या सुंदर जोडप्याचा फोटो)

 रोहित शर्मा करणार मोठा विक्रम

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 149 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत रोहित शर्माच्या बॅटमधून 3853 धावा झाल्या आहेत. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावली आहेत. या यादीत आयर्लंडचा पॉल स्ट्रेलिंग दुसऱ्या स्थानावर आहे. पॉल स्ट्रेलिंगने 134 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सध्या रोहितच्या आसपास दुसरा क्रिकेटर नाही. रोहित शर्मा इंदूरमधील पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे, जो 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

रोहित शर्मा बाबर आझमच्या 'या' विक्रमाची करू शकतो बरोबरी 

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा अनोखा विक्रम करू शकतो. रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त स्कोअर करण्याच्या बाबतीत बाबर आझमची बरोबरी करू शकतो. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज देखील विराट कोहली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर 38 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आहे. यानंतर बाबर आझम या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझमने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा अशी कामगिरी केली आहे. म्हणजेच रोहित शर्माने आणखी 50 प्लसची इनिंग खेळताच तो बाबर आझमची बरोबरी करेल.

मालिका काबीज करण्याकडे भारताचे लक्ष

आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा दुसरा टी-20 सामना जिंकून मालिका काबीज करण्याकडे लक्ष असेल. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील या मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. इंदूरमध्ये होणारा दुसरा टी-20 हा अफगाणिस्तानसाठी लढा किंवा मरो असा सामना असणार आहे.