IND vs ENG: उंपात्य फेरीत लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्माने गोलंदाजावर फोडले खापर, काय म्हणाला घ्या जाणून

भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले, टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीटीम इंडियाने सुपर-12 मध्ये चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, पण इथे भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरले. आम्ही चेंडूने कामगिरी करू शकलो नाही, असे कर्णधार रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला. सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही आज वाईट खेळलो म्हणून खूप निराश झालो. ती धावसंख्या मिळवण्यासाठी आम्ही बॅकएंडवर चांगली फलंदाजी केली. आम्ही आज विजयी होवू शकलो नाही. हे सर्व बाद फेरीतील दडपण हाताळण्याबद्दल असते.

भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, 'आम्ही सुरुवातीला नर्व्हस होतो, पण तुम्हाला श्रेय त्यांच्या सलामीवीरांना द्यावे लागेल, ते खरोखरच चांगले खेळले. मला पहिल्या षटकात तो चेंडू स्विंग वाटत होता, पण तो योग्य भागात टाकला गेला नाही. जेव्हा आम्ही पहिला गेम जिंकला, तेव्हा त्यात बरेच चारित्र्य दिसून आले. बांगलादेशविरुद्धचा सामना खूपच कठीण होता. मला असे वाटले की आपण स्वतःला धरून आहोत आणि आपल्या योजना राबवत आहोत. पण आम्ही ते आज करू शकलो नाही.' (हे देखील वाचा: Fans Miss MS Dhoni: उंपात्या फेरीत England ने India ला दाखवला घरचा रस्ता, भारतीय चाहत्यांना Dhoni ची भासत आहे उणीव)

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने एकही विकेट न गमावता ही धावसंख्या गाठली. यादरम्यान जोस बटलरने 80 आणि अॅलेक्स हेल्सने 86 धावांची नाबाद खेळी केली. हेल्सला त्याच्या अप्रतिम खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.