Praveen Kumar Road Accident: टीम इंडियाचा माजी गोलंदाज प्रवीण कुमार (Pravin Kumar) रस्ता अपघाताचा बळी ठरला आहे. अपघाताच्या वेळी ते मुलासह कारमध्ये उपस्थित होते. दोघेही सुरक्षित असले तरी कारची अवस्था बिकट आहे. ही घटना 4 जुलै रोजी रात्री मेरठमध्ये घडली, जेव्हा प्रवीण कुमार त्यांच्या मुलासह त्यांच्या डिफेंडर कारने पांडव नगर बाजूकडून घरी परतत होते, तेव्हा आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ एका वेगवान कॅंटरने त्यांच्या कारला धडक दिली. अपघात होताच घटनास्थळी असलेल्या लोकांनी कॅंटर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
एसपी सिटी पियुष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅंटर चालकाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. प्रवीण कुमार आणि त्यांचा मुलगा सुखरूप आहे. याआधीही 2007 मध्ये मेरठमध्ये झालेल्या रिसेप्शनदरम्यान प्रवीण कुमार उघड्या जीपमधून पडले होते. (हे देखील वाचा: Team India Chief Selector: माजी क्रिकेटर Ajit Agarkar यांची पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; चेतन शर्माची घेणार जागा, पगारातही वाढ)
बाल-बाल बचे पूर्व क्रिकेटर प्रवीण कुमार
मेरठ सिटी में अपनी कार से जाते समय दुर्घटना के शिकार, उनकी कार को तेज रफ्तार कैंटर ने मारी टक्कर, प्रवीण कुमार के साथ कार में उनका बेटा भी...@praveenkumar @meerutpolice pic.twitter.com/MXMCLw0I7S
— First India News (@1stIndiaNews) July 5, 2023
2007 मध्ये केले होते पदार्पण
प्रवीण कुमार हा स्विंग गोलंदाज होता. 2012 मध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यानंतर त्याला टीम इंडियात पुन्हा संधी मिळाली नाही. 2007 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणारा प्रवीण कुमार आता 36 वर्षांचा झाला आहे. तो भारतासाठी सर्व फॉरमॅट खेळला आहे.
प्रवीण कुमारची क्रिकेट कारकीर्द
आपल्या स्विंगने फलंदाजांची शिकार करणाऱ्या प्रवीण कुमारने टीम इंडियासाठी 6 कसोटी सामन्यात 27 बळी, 68 एकदिवसीय सामन्यात 77 बळी आणि 10 टी-20 सामन्यात 8 बळी घेतले आहेत. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी या डॅशिंग क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली.