Team India Chief Selector: माजी क्रिकेटर Ajit Agarkar यांची पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; चेतन शर्माची घेणार जागा, पगारातही वाढ

आगरकर यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्ली कॅपिटल्स सोडली होती. यानंतर आगरकर यांना मुख्य निवडकर्ता बनवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले.

Team India Chief Selector: माजी क्रिकेटर Ajit Agarkar यांची पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; चेतन शर्माची घेणार जागा, पगारातही वाढ
Ajit Agarkar (Photo Credit - Twitter)

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची मंगळवारी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर आगरकर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-20 संघ निवडण्यासाठी निवड समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करतील. चेतन शर्माच्या जागी अजित आगरकर मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहतील. अजित आगरकर यांना मुख्य निवडकर्ता बनवण्यासाठी बीसीसीआयने पगारातही वाढ केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुख्य निवड समितीचे पद रिक्त होते. आता या पदासाठी अजित आगरकर यांची निवड करण्यात आली आहे. आगरकर यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्ली कॅपिटल्स सोडली होती. यानंतर आगरकर यांना मुख्य निवडकर्ता बनवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकापूर्वी अजित आगरकर यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. यासोबतच यंदा होणाऱ्या विश्वचषकाबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (हेही वाचा: Ashes 2023: जॉनी बेअरस्टो धावबाद होण्यावरुन वाद, UK PM Rishi Sunak यांच्याकडून बेन स्टोक्स याचे समर्थन)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2023 11:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).