Afro-Asia Cup: जवळपास दोन दशकांनंतर, आफ्रो-आशिया चषक (Afro-Asia Cup) पुन्हा सुरू करण्याची योजना आहे, ज्यामध्ये आशिया इलेव्हन आणि आफ्रिका इलेव्हन (Asia XI vs Africa XI) यांच्यातील पांढऱ्या चेंडूचे सामने असतील. आफ्रिकन क्रिकेट असोसिएशन (ACA) ने आपल्या वार्षिक परिषदेत स्पर्धा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली, ज्यामध्ये सहा सदस्यांची अंतरिम समितीही स्थापन करण्यात आली. एसीए मजबूत करणे आणि आफ्रिकन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक स्पर्धात्मक संधी निर्माण करणे हा समितीचा उद्देश आहे. (हे देखील वाचा: IND A vs AUS A 2nd Unofficial Test 2024 Live Streaming: ऑस्ट्रेलिया अ ला पराभूत करून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने भारत अ संघ उतरणार मैदानात, येथे जाणून घ्या थेट सामन्याचा कधी, कुठे घेणार आनंद)
भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना एकाच संघात पाहण्याती संधी
ही स्पर्धा पुन्हा झाल्यास भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना एकाच संघात खेळताना पाहण्याची दुर्मिळ संधी मिळेल. जे सध्या फक्त आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. प्रेक्षकांसाठी ही मोठी उत्सुकता आहे, कारण विराट कोहली, बाबर आझम, रोहित शर्मा, मोहम्मद रिझवान सारखे खेळाडू एकाच संघात खेळू शकतात.
#Throwback: During the Afro-Asia Cup in 2005 and 2007, the Asia XI lost only one game out of five matches 🌟🏆
Which team would win if the tournament were revived? 👇#AsiaXI #AfricaXI #ODI #Sportskeeda pic.twitter.com/y3GhpxOWkV
— Sportskeeda (@Sportskeeda) September 13, 2024
आशियाई क्रिकेट परिषदेकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
"आफ्रो-आशिया चषक हा केवळ खेळासाठीच नाही तर आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. दोन्ही खंडांतील खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे," असे एसीएचे अंतरिम अध्यक्ष आणि झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंगा मुखलानी म्हणाले. आशियाई क्रिकेट असोसिएशनकडून अद्याप या स्पर्धेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी ही स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
Probable Asia XI for the Afro-Asia Cup!🌍🏏 pic.twitter.com/FKv8WPnXvB
— CricketGully (@thecricketgully) November 6, 2024
आफ्रो-आशिया कपचा इतिहास
आफ्रो-आशिया चषक आतापर्यंत फक्त दोन वेळा खेळला गेला आहे, 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आणि 2007 मध्ये भारतात. 2005 आफ्रो-आशिया कपमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली, ज्यामध्ये एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि उर्वरित सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. तर 2007 च्या स्पर्धेत आशिया इलेव्हनने तिन्ही सामने जिंकले होते. 2009 मध्ये केनियामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु ते आयोजित होऊ शकले नाही. आता जवळपास वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच्या संघटनेचा गांभीर्याने विचार केला जात आहे.