Australia A National Cricket Team vs India A National Cricket Team: ऑस्ट्रेलिया अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 07 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा 7 गडी राखून पराभव केला. अशा स्थितीत यजमान संघाच्या नजरा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर असतील. दुसरीकडे, भारत अ संघाला पुनरागमन करायचे आहे आणि दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया अ संघाला पराभूत करून मालिका बरोबरीत आणण्याकडे त्यांचे लक्ष असेल. याशिवाय सर्वांच्या नजरा केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांच्यावरही असतील जे दुसऱ्या अनौपचारिक सामन्यासाठी संघात सामील झाले आहे. राहुल न्यूझीलंडविरुद्ध फक्त एकच कसोटी सामना खेळला. तर जुरेल तिन्ही सामन्यात बाहेर होता.
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ यांच्यातील दुसरा अनधिकृत कसोटी सामना कधी खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ हा पहिला अनधिकृत कसोटी सामना गुरूवार, 07 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता खेळवला जाईल. (हे देखील वाचा: Border Gavaskar Trophy 2024: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट-रोहितपेक्षा 'या' खेळाडूचे आकडे आहे खास, तरीही टीम इंडियात नाही स्थान)
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ दुसरा अनधिकृत कसोटी सामना कुठे पाहणार?
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि भारतात थेट स्ट्रीमिंग माहिती अद्याप पुष्टी झालेली नाही. परंतु आशा आहे की अद्यतने लवकरच प्रदान केली जातील. मात्र, भारतातील प्रेक्षकांसाठी हा सामना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाइट आणि ॲपद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल.
दोन्ही संघांची खेळाडू
भारत अ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इसवरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मुकेश कुमार, खलील अहमद , यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल.
ऑस्ट्रेलिया अ: नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, स्कॉट बोलँड, जॉर्डन बकिंगहॅम, कूपर कोनोली, ऑली डेव्हिस, मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास, नॅथन मॅकअँड्र्यू, मायकेल नेसर, टॉड मर्फी, फर्गस ओ'नील, जिमी पीअरसन, जोश फिलिप, कोरी रोचिओली, मार्क स्टीकेटी, ब्यू वेबस्टर.