AFG vs ZIM (Photo Credit - X)

Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर (शनिवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळवला जाईल. मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. झिम्बाब्वेने पहिला सामना चार गडी राखून जिंकला होता, मात्र शुक्रवारी अफगाणिस्तान संघाने शानदार पुनरागमन करत 50 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, आता पुढील सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. (हे देखील वाचा: AFG vs ZIM 2nd T20I Match 2024 Scorecard: अफगाणिस्तानने दुसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 50 धावांनी केला पराभव, रशीद खानने केली घातक गोलंदाजी; मालिका 1-1 अशी बरोबरीत)

किती वाजता सुरु होईल सामना?

झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर (शनिवार) रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 05:00 वाजता सामना खेळवला जाईल. ज्याचा टॉस दुपारी 04:30 वाजता होणार आहे.

कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खूपच रोमांचक असणार आहे. मात्र, ही मालिका भारतात प्रसारित करण्याचे अधिकार कोणत्याही टीव्ही वाहिनीने घेतलेले नाहीत. त्यामुळे या सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध होणार नाही. पण तुम्ही हा सामना फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकतात. हे प्लॅटफॉर्म लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल, जिथे चाहत्यांना या टी-20 सामन्याचा आनंद घेता येईल.