Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 2nd T20 Match 2024 Scorecard Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 13 डिसेंबर रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला गेला. दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 50 धावांनी पराभव केला. यासह अफगाणिस्तानने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझाकडे आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान करत आहे. (हे देखील वाचा: SA Beat PAK 2nd T20I 2024 Scorecard: दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी, रीझा हेंड्रिक्सने झळकावले शतक)
येथे पाहा स्कोरकार्ड
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 33 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 153 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी दरवेश रसूलीने सर्वाधिक 58 धावांची खेळी खेळली. या झंझावाती खेळीदरम्यान दरवेश रसूलीने 42 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. दरवेश रसूलीशिवाय अजमतुल्ला उमरझाईने 28 धावा केल्या.
Naveen, Rashid take three each to give Afghanistan a thumping win and level the series 1-1 https://t.co/MeoQn9Dwna | #ZIMvAFG pic.twitter.com/TFBpNC7Tep
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 13, 2024
दुसरीकडे ट्रेव्हर ग्वांडूने झिम्बाब्वे संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. झिम्बाब्वेकडून ट्रेव्हर ग्वांडू आणि रायन बर्ल यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. ट्रेव्हर ग्वांडू आणि रायन बर्लशिवाय ब्लेसिंग मुझाराबानीने एक बळी घेतला. हा सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वे संघाला 20 षटकात 154 धावा करायच्या होत्या.
झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 17.4 षटकांत केवळ 103 धावांवर गारद
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वे संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि अवघ्या 49 धावा करून संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 17.4 षटकांत केवळ 103 धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक 35 धावांची खेळी खेळली. सिकंदर रझाशिवाय सलामीवीर ब्रायन बेनेट 27 धावा केल्या.
रशीद खान आणि नवीन-उल-हकने प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी
नवीन-उल-हकने अफगाणिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानकडून रशीद खान आणि नवीन-उल-हकने प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. रशीद खान आणि नवीन-उल-हकशिवाय मुजीब उर रहमानने दोन बळी घेतले. उभय संघांमधील मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या म्हणजेच 14 डिसेंबर रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे.