IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आज हाय व्होल्टेज सामना, सगळ्यांच्या नजरा असणार 'या' खेळाडूंकडे
IND vs SL (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना (IND vs SL 3rd T20) रंगणार आहे. राजकोटच्या (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि दासून शनाकाच्या (Dasun Shanaka) नेतृत्वाखालील श्रीलंका विजयासाठी भिडणार आहेत. हा सामना सायंकाळी सात वाजता होणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना 2 धावांनी जिंकला होता. त्याचवेळी पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव करत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. (हे देखील वाचा: IND vs SL 3rd T20 Live Streaming: राजकोट मध्ये रंगणार आज तिसरा टी-20 अंतिम सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार लाईव्ह)

मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. त्याचवेळी टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याला हा सामना आपल्या नावावर करायचा आहे. हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून आतापर्यंत फक्त एकच सामना गमावला आहे. हार्दिकने कर्णधार म्हणून भारतासाठी चमकदार कामगिरी केली.

सर्वांच्या नजरा असतील 'या' खेळाडूंवर

हार्दिक पंड्या

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या या मालिकेत आतापर्यंत काही खास कामगिरी करू शकला नाही. पण मोठ्या मॅचमध्ये पांड्या बॅट आणि बॉल दोन्हीने कहर करतो. अशा स्थितीत आजच्या अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा हार्दिक पांड्याकडे असतील.

सूर्यकुमार यादव

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव देखील सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाला. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत धडाकेबाज अर्धशतक ठोकले. सूर्यकुमार यादवची बॅटही चालली तर तो श्रीलंकेच्या गोलंदाजांची लाईन लेंथ खराब करू शकतो.

शिवम मावी

टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात पदार्पण केले आहे. शिवम मावीने पहिल्या टी-20 सामन्यात चार विकेट घेतल्या. आयपीएल स्टार शिवम मावीला आयपीएल मिनी लिलावात गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपयांना विकत घेतले. शिवम मावीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले आहे आणि आता टीम इंडियासाठी चमत्कार करण्याची त्याची पाळी आहे. तिसर्‍या टी20 सामन्यातही सर्वांच्या नजरा शिवम मावीवर असतील.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी.

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चरित अस्लांका, दासुन शानाका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, महेश टीक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका, चमिका करुणारत्ने.