IND vs SL 3rd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (IND vs SL 3rd T20) सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. शनिवारी (7 जानेवारी) दोन्ही संघ आमनेसामने असतील. मुंबईतील पहिला टी-20 सामना भारताने जिंकला. त्याचवेळी श्रीलंकेने पुण्यातील दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. राजकोटमधील विजयी संघ ही मालिका जिंकेल. हार्दिकच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. त्याने आयर्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. हार्दिक तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधणार आहे. भारतीय संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. (हे देखील वाचा: IND vs SL: अर्शदीप सिंगच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, नो-बॉलच्या विचित्र हॅटट्रिकमुळे आला पुन्हा चर्चेत)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 सामना 7 जानेवारीला म्हणजे आज होणार आहे आणि हा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल.
तिसरा टी-20 सामना किती वाजत खेळवला जाणार आहे?
भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे तसेच 6.30 वाजता नाणेफेक होईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोणत्या चॅनलवर पाहू शकता?
तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड वर भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना पाहू शकतात
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकतात?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही विनामूल्य कुठे पाहू शकता?
डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्मद्वारे डीडी स्पोर्ट्सवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही विनामूल्य पाहू शकता.