KL Rahul (Photo Credit - Twitter)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील (IND vs SA) पहिल्या सामन्यात भारताने 8 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. भारताकडून केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) यांनी अर्धशतके झळकावली. ओलसर आणि उसळत्या खेळपट्टीवर सूर्यकुमारने 33 चेंडूत नाबाद 50 तर राहुलने 56 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. त्याचवेळी, या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण असल्याचे राहुलने सामना संपल्यानंतर सांगितले. सूर्यकुमारची आक्रमक फलंदाजी पाहून थक्क झालो. सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला, 'साहजिकच या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते. आम्ही यापूर्वी अशा कठीण खेळपट्ट्यांवर फलंदाजी केली आहे, पण तेथे धावा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ही खेळी खूप कठीण होती.

आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवचे कौतुक करताना तो म्हणाला, ''सूर्यकुमार मैदानावर येताच असे फटके खेळताना पाहणे अविश्वसनीय होते. येथे चेंडू कसा स्विंग होत होता हे तुम्ही पाहिलेच असेल. खेळपट्टीवरून चेंडूला दुप्पट गती मिळत होती आणि काही चेंडू थांबत होते. त्यावर फलंदाजी करणे कुणालाही अवघड झाले असते. (हे देखील वाचा: IND vs SA 1st T20I: पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर कर्णधार रोहित 'या' खेळाडूंच्या कामगिरीने झाला थक्क, कौतुकात म्हणाला...)

अर्शदीप सिंहचेही  केले कौतुक

राहुलने यावेळी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहचेही कौतुक केले, ज्याने सलामीच्या षटकातच तीन विकेट घेत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. हा सलामीवीर म्हणाला, 'प्रत्येक सामन्यात त्याच्या खेळात सुधारणा होत आहे. तो मोठ्या मनाचा (दबावात संयम राखणारा) खेळाडू आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करताना मी त्याला जवळून पाहिले आहे. राहुल म्हणाला, 'आम्हाला नेहमीच डावखुरा वेगवान गोलंदाज संघात हवा होता आणि अर्शदीपसारखा पर्याय मिळणे खूप छान आहे.'