Harshit Rana and Morne Morkel (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना (IND vs BAN 3rd T20I) शनिवारी (12 ऑक्टोबर) हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ हैदराबादला पोहोचले आहेत. या मालिकेत टीम इंडियाने यापूर्वीच अजेय आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत टीम इंडिया हा सामना जिंकून क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, या सामन्यात टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो. चला जाणून घेऊया सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर तिसऱ्या टी-20 सामन्यात कोणत्या खेळाडूंला पदार्पणाची संधी मिळेल.

 हर्षित राणाला मिळू शकतो पदार्पणाची संधी

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादवने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. आतापर्यंत रवी बिश्नोई, जितेश शर्मा, हर्षित राणा आणि तिळक वर्मा यांना या मालिकेत संधी मिळालेली नाही. हर्षित राणा अजूनही पदार्पणाच्या सामन्याची वाट पाहत आहे. मात्र, सूर्यकुमार यादव तिसऱ्या सामन्यात हर्षित राणाला संधी देऊ शकतो. (हे देखील वाचा: India vs Bangladesh 3rd T20I Preview: बांगलादेशचा ‘सूर्या’स्त होणार! टी-20 मालिकेत क्लीन स्वीप देण्यास भारत सज्ज, त्याआधी जाणून घ्या मॅच प्रीव्ह्यू)

मयंक यादवला मिळू शकतो विश्रांती 

तिसऱ्या टी-20 सामन्यात संघ व्यवस्थापन मयंक यादवला विश्रांती देऊ शकते. त्याच्या जागी हर्षित राणालाच संधी मिळू शकते. हर्षित राणाने आयपीएल 2024 मध्ये केकेआरकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. त्याने 18 विकेट घेतल्या होत्या. तो मधली षटके आणि नवीन चेंडू टाकू शकतो.

संजू सॅमसनला स्वतःला सिद्ध करण्याची संधी 

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये संजू सॅमसनला चांगली सुरुवात झाली, पण त्याला त्याचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही. अशा स्थितीत आता त्याला तिसऱ्या सामन्यात मोठी खेळी खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याच्याशिवाय सर्वांच्या नजरा अभिषेक शर्मावर खिळल्या आहेत. आयपीएलमध्ये हैदराबादच्या या मैदानावर त्याने स्फोटक फलंदाजी केली होती. अशा स्थितीत तो या सामन्यातही खळबळ माजवू शकतो.

टीम इंडियाची संभाव्य इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.