26/11 Mumbai Terror Attacks: मुंबई दहशतवादी हल्ल्याची 12 वर्ष! सचिन तेंडुलकर, कोहली यांनी यांनी तुकाराम ओंबळेसह शहीदांना वाहिली श्रद्धांजली
मुंबई दहशतवादी हल्ला श्रद्धांजली (Photo Credits: Twitter)

26/11 Mumbai Terror Attack: 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेला आज 12 वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांनी हॉटेल ताज आणि ट्रायडेंट हॉटेलबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 166 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला तर, मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आलं. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या आजच्या दिवशी देशाला झालेल्या नुकसानाच्या आठणींना उजाळा दिला. सेहवागने दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या मुंबई पोलिस सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांना मनापासून श्रद्धांजली वाहिली. ओंबळे यांना 'आपल्या मातीचा महान पुत्र' म्हणत वीरूने पोलिस कॉन्स्टेबल ओंबळे यांचे त्या दिवशी दाखविलेल्या 'धैर्य, निस्वार्थीपणा' कौतुक केले. (26/11 Mumbai Terror Attack 12th Anniversary: मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या 'या' शूरवीरांबद्दल अधिक जाणून घेत करुयात त्यांच्या कार्याला सलाम)

वीरेंद्र सेहवाग

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनीही 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहिदांची आठवण काढली. प्राण वाचवणाऱ्या सुरक्षा कर्मचार्‍यांना 'ब्रेव्हार्ट्स' म्हणून संबोधत कोहली म्हणाला की, हल्ल्यात ठार झालेले सर्वच कायम स्मरणात राहतील. ते 'कायम आपल्या अंतःकरणामध्ये राहतील' असेही कोहलीने पुढे म्हटले.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला की, "जखमा बऱ्या झाल्या असल्या तरी त्याचे डाग अद्याप कायम आहेत. प्राण गमावले आणि शाहिद झाले. कोणत्याही प्रकारच्या कृत्यावर विजय मिळविण्याकरिता मानवी आत्म्याचे सामर्थ्य नेहमीच स्मरणात राहील."

आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने देखील आजचा दिवस कधीही विसरला जाणार नाही असे कॅप्शन देत फोटो शेअर केला.

12 वर्षांनंतरही मुंबईत चार दिवस चाललेल्या पाकिस्तान-आधारित अतिरेकी इस्लामी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या 10 सदस्यांनी केलेल्या 12 समन्वित हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची आठवण आजची प्रत्येक मुंबईकरांच्या मनात जिवंत आहे. 12 हल्ल्यांपैकी आठ हल्ले दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट, ताज पॅलेस अँड टॉवर, लिओपोल्ड कॅफे, मुंबई चाबड हाऊस, नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटल, मेट्रो सिनेमा अशा वेगवेगळ्या ठिकाणी घडले. टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंग आणि सेंट झेविअर्स कॉलेजच्या मागच्या गल्लीत दोन हल्ले, मझागाव भागात स्फोट आणि विलेपार्ले येथील टॅक्सीमध्ये बॉम्ब स्फोट करवण्यात आला. 10 हल्लेखोरांपैकी 9 ठार झाले आणि एक अजमल कसाब याला पकड्ण्यातव सुरक्षा दलाला यश आले. कसाबला 2012 मध्ये पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.