COVID-19 Pandemic: मैदानावर घाम गाळणारे 'हे' खेळाडू कोरोना व्हायरसच्या संकट काळात पोलीस म्हणून लढत आहे लढाई
अजय ठाकूर (Photo Credit: Instagram)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण भारतात (India) लॉकडाऊन करण्यात आले आहे. खेळाडू, व्यवसायी, कामगार घरी बसले असताना असे काही लोकं आहेत जे या संकट काळात सर्वात पुढे राहून लढा देत आहेत. जागतिक महामारीमुळे व्यवसायापासून क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. व्यास ठप्प झाले असून अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दरम्यान, खेळाच्या मैदानावर देशासाठी घाम गळणारे यापैकी काही खेळाडूंनी खाकी गणवेश धारण केला आणि कोविड-19 विरुद्ध विरोधात लढाईत करण्यात आलेय देशव्यापी बंद दरम्यान लोकांना त्यांच्या घरीच रहाण्याचे आवाहन करीत आपले कर्तव्य बजावत आहेत. एकीकडे जिथे पोलिसांना मारहाण करण्याचे वृत्त समोर येत आहे, अशा स्थितीत पोलिस दलात कार्यरत असणारे हे खेळाडू  थेट रस्त्यावर उतरून करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. वर्ल्ड कप विजेता क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma), भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार राजपाल सिंह (Rajpal Singh), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता बॉक्सर अखिल कुमार (Akhil Kumar) आणि एशियन गेम्सचा चॅम्पियन कबड्डीपटू अजय ठाकूर (Ajay Thakur) हे सर्व पूर्णवेळ पोलिस अधिकारी आहेत आणि क्रीडा जगातल्या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ही नोकरी मिळाली आहे. (Coronavirus: भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा क्रिकेटपटू आता 'या' अंदाजात देतोय कोरोना व्हायरसविरुद्ध लढा)

पीटीआयशी बोलताना हरियाणाचे पोलिस अधिकारी आणि चांगले मित्र शर्मा आणि कुमार या दोघांनीही अभूतपूर्व संकटात ‘कर्तव्य’ केल्याने उद्भवलेल्या आव्हानं उघडकीस केली. “मी 2007 पासून डीएसपी आहे. सर्वसाधारण भीतीमुळे पोलिस अधिकारी म्हणून माझ्यासाठी हे एक प्रकारचे आव्हान आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो की पोलीस म्हणून मी माझ्या कार्यकाळात विविध आव्हानांना सामोरे गेलो आहे," अष्टपैलू शर्मा म्हणाला. 36 वर्षीय शर्मा सध्या हिसार येथे पोस्ट आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गुरुग्राम पोलिसात एसीपी म्हणून काम पाहत कुमार म्हणाले की, "लोक सहसा सहकार्य करतात आणि कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक सेवा खुल्या ठेवल्या जातात ज्यामुळे घाबरुन जाऊ शकत नाहीत. केवळ लॉकडाउनची कठोर अंमलबजावणीच हा व्हायरस थांबविण्यात सक्षम होईल, असा माझा विश्वास आहे. लोक हळूहळू हे समजत आहेत." कुमार काही मित्रांच्या मदतीने गरजूंना पुरवठा करीत आहेत. तिसरा असा एथलीट म्हणजे भारतीय कबड्डी स्टार अजय ठाकूर जो रस्त्यावर गस्त घालताना आणि लोकांना “घरी रहा, प्राण वाचवा” असे आवण करताना दिसला. ठाकूर हिमाचल प्रदेश पोलिसात डीएसपी आहेत आणि 2017 पासून सेवेत आहेत.

दरम्यान, विषाणूने जागतिक स्तरावर आजवर 24,000 हून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बातमी लिहीपर्यंत भारतात 873 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे, तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे.