आज भारत - पाकिस्तान लढणार हॉकीच्या मैदानावर आमने सामने
हिंदूस्थान हॉकी संघ (फोटो सौजन्य- फेसबुक)

भारताच्या हॉकी संघाने जपानला हरवून अंतिम फेरीत झेप घेतली आहे. तसेच आज रात्री 10.40 वाजता भारत- पाकिस्तानमध्ये आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी ही लढत रंगणार आहे.

मस्तकमध्ये चालू झालेल्या आशियाई आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी  भारताला 3-2 ने हरविले होते. तसेच जपानविरुद्धच्या या हॉकी सामन्यात भारताच्या संघातील गुरजंत, चिंगलेनसाना आणि दिलप्रीत यांनी तीन गोल केले. त्यामुळे जपानला  भारतापुढे हार मानावी लागली आहे.

तसेच पाकिस्तानने मलेशियाला 3-1ने पराभव करुन अंतिम फेरीत झेप घेतली आहे. तर आज होणारा आशियाई चॅम्पियन हॉकी ट्रॉफसाठीची अंतिम लढत पाहाण्याजोगी असणार आहे.