Ashes series 2019: स्टीव्ह स्मिथ याने मोडले अनेक विक्रम; ग्रीम स्मिथ, इंजमान उल हक यांनाही टाकले मागे
Steve Smith (Twitter)

अॅशेस मालिका (Ashes series) पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या (Australia) फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने त्याच्या नावावर केली आहे, असे सांगणे चूकीचे ठरणार नाही. अॅशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे आणि या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथने पुन्हा एकदा अर्धशतक ठोकले आहे. अॅशेस मालिकेत त्याने सलग 10 वे अर्धशतक झळकावले आहे. या खेळीनंतर स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला आहे. स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानचा (Pakistan) फलंदाज इंजमाम उल हाक (Inzamam Ul Haq) आणि दक्षिण अफ्रिकेचा (South Africa) फलंदाज ग्रीम स्मिथ (Graeme Smith) यांचे विक्रम मोडले आहेत. तसेच यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 50 धावा करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. एवढेच नव्हे तर, अॅशेस मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचे विक्रम स्मिथ याने त्याच्या नावावर नोंदवले आहे.

अ‍ॅशेस 2019 मध्ये स्टीव्ह स्मिथने इंग्लंड विरुद्ध सलग 10 वे अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकानंतर एका संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सलग 50 किंवा त्याहून अधिक वेळा धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. स्मिथने पाकिस्तानचा माजी फलंदाज इंझमाम-उल-हकचा विक्रम मोडला आहे. इंझमामने इंग्लंडविरुद्ध सलग 9 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथने 90 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक ठोकले. त्याने जॅक लीचच्या गोलंदाजीवर षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीचे 27 वे अर्धशतक होते. त्याचबरोबर अॅशेस कसोटी 2019 मध्ये त्याने आपले सहावे अर्धशतक ठोकले आहे. या सामन्यात त्याने 145 चेंडूंचा सामना करत 80 धावा केल्या आहेत. परंतु, क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर स्मिथ एलबीडब्ल्यू बाद झाला. हे देखील वाचा-Ashes 2019: पाचव्या टेस्ट मॅचमध्ये डेविड वॉर्नर याने केला लज्जास्पद रेकॉर्ड, वाचा सविस्तर

 

यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 धावा

यावर्षी, स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 धावांचा विक्रम करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने सलग ६ डावात ६ अर्धशतके ठोकल्याची नोंद केली आहे. यावर्षी डिकॉकने ७ डावात ५ अर्धशतक ठोकले आहे. डिकॉकची पहिल्या स्थानावरुन घसरण झाली आहे. सध्या स्टीव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर आहे.

 

2019 कसोटीत सर्वाधिक 50 धावा

-स्मिथ - 6 * (6 डाव)

-डे कॉक - 5 (7 डाव)

-एम लबुसॅग्गेन - 5 (10 इनिंग)

-रूट - 5 (17 डावा)

 

अॅशेस मालिकेतील सर्वाधिक धावा

अ‍ॅशेस 2019 मध्ये स्टीव्ह स्मिथने आपले 700 धावा पूर्ण केले आहेत. कसोटी मालिकेत त्याने दुसऱ्यांदा 700 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचे सर्वोकृष्ट काम केले आहे. स्मिथने सुनील गावस्कर आणि ब्रायन लाराचा यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कसोटी मालिकेत 700हून अधिक धावा करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन याच्या नावावर आहे. त्याने तब्बल ५ वेळा हे विक्रम केले आहेत.

 

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा

इंग्लंडच्या भूमीवरील कोणत्याही एक कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्टीव्ह स्मिथ ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथचा विक्रम मोडला. 2003 मध्ये ग्रीम स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या भूमीवर कसोटी मालिकेत सर्वाधिक 714 धावा केल्या होत्या. अॅशेस मालिकेत स्मिथने 4 सामन्यांच्या 6 डावांमध्ये 125.16 च्या सरासरीने 751 धावा केल्या आहेत. त्याने 3 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. या मालिकेत त्याने सर्वोत्तम 211 धावा केल्या आहेत.