Ashes 2019: पाचव्या टेस्ट मॅचमध्ये डेविड वॉर्नर याने केला लज्जास्पद रेकॉर्ड, वाचा सविस्तर
डेविड वॉर्नर (Photo Credit: @englandcricket/Twitter)

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पाचव्या आणि अंतिम अ‍ॅशेस (Ashes) सामना रंगतदार बांगला आहे. टॉस जिंकून गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन करत इंग्लंडला दुसऱ्या दिवशी 294 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट संघात पुनरागमन करणाऱ्या मिशेल मार्श याने 5 विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजांना मुश्किलीत टाकले. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात पुन्हा अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर डेविड वॉर्नर यंदाच्या मालिकेत पुन्हा आपला ठसा उमटवण्यास अपयशी राहिला. पाचव्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाने कदाचित अ‍ॅशेस राखली असेल, पण सलामीवीर वॉर्नरसाठी ही मालिका दयनीय राहिली आहे. आणि शुक्रवारी सकाळी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 294 धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव त्याने सुरू केल्यामुळे त्याचा जुना फॉर्म कायम राहिला. (बॉल टेम्परिंग प्रकरणावर अ‍ॅलिस्टर कुक याचा धक्कादायक खुलासा, डेविड वॉर्नर याच्यावर केला मोठा आरोप)

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची सुरुवात करायला आलेल्या वॉर्नर पुन्हा एकदा खराब फलंदाजीचा बळी पडला. विशेषतः यंदाच्या डावात स्टुअर्ट ब्रॉड याने नाही तर जोफ्रा आर्चर याने त्याला माघारी धाडले. याच सह वॉर्नरने टेस्ट क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. वॉर्नरने पाचव्या टेस्टच्या पहिल्या डावात 5 धावा केल्या आणि पहिला असा सलामीवीर बनला जो आठ वेळा एक अंकी धाव संख्येवर बाद झाला आहे. यंदाच्या मालिकेत वॉर्नरने 2, 8, 3, 5, 61, 0, 0, 0, 5 अश्या धावा केल्या आहेत.

दुसऱ्या दिवशी पहाटे पॅट कमिन्स याने जोस बटलर याची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. बटलर 70 धावा करून कमिन्सने बोल्ड केले. यानंतर, मार्शने जॅक लीच याला बाद करून आपला पाचवी विकेट घेतली. मालिकेच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी जोस बटलर आणि जॅक लीच फलंदाजीस उतरले आहेत. पहिल्या दिवशी इंग्लंडने आठ विकेट गमावल्यानंतर 271 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ सुरुवातीला संघर्ष करीत होता. एकाच वेळी 170 धावांवर तीन विकेट गमावलेल्या इंग्लंडने 226 धावांपर्यंत आठ विकेट गमावले होते.