अ‍ॅलिस्टर कुक आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty)

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक (Alastair Cook) यांनी म्हटले आहे की ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने एकदा त्याला सांगितले होते की तो प्रथम श्रेणी सामन्यांत चेंडूशी छेडछाड करण्यासाठी हातात टेप घालत असे. आयएएनएसनुसार वॉर्नरवर बॉल टॅम्परिंगमुळे एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. मागील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात त्याला असे करताना पकडले गेले होते. इंग्रजी वृत्तपत्र 'द गार्डियन' ने कुकपासून उद्धृत केले आहे की, "बीअर पिल्यानंतर वॉर्नर त्याला म्हणाला होता की तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये टेप लावून चेंडूशी छेडछाड करीत असे. तो टेपवर काही साहित्य ठेवत असेत जेणेकरून बॉल लवकर खराब होईल. मी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) कडे पाहिले जे हावभावात सांगत होते की, तुला असे बोलायला नको हवे होते." (Ashes 2019: डेविड वॉर्नर याने केली '0' ची हॅटट्रिक, जाणून घ्या का मैदानातून हसत बाहेर पडला)

कुक म्हणाला, 'स्टुअर्ट ब्रॉड याने हे वृत्त चांगल्या प्रकारे पूर्ण केले आणि म्हणाला की अ‍ॅशेसमध्ये तो बॉलचा रिव्हर्स स्विंग करत होता. आपण करत होतात त्यात बदल का? अचानक सॅंडपेपर का? काय चालले आहे हे लोकांना माहित होते, परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी ही सर्वात चांगली गोष्ट होती कारण यामुळे त्यांना कळले की अशा प्रकारची कृती मान्य नाही. काहीही झाले तरी विजय मिळवण्याची संस्कृती ऑस्ट्रेलियन जनतेला नको होती."

दरम्यान, यानंतर वॉर्नरवर स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्या साथीने एक वर्षीची बंदी घालण्यात आली होती. त्यांनतर स्मिथ आणि वॉर्नरने विश्वचषक मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. यामध्ये वॉर्नरने चांगली खेळी केली तर स्मिथला आपली छाप सोडण्यात अपयश आले. पण, इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेत स्मिथने प्रभावी खेळी केली तर वॉर्नरला सर्व सामन्यात अपयशाला सामोरे जावे लागले.