बर्मिंगहॅम (Birmingham) येथे 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्सचे (Commonwealth Games) पहिले सुवर्णपदक (Gold medal) यजमान इंग्लंडला देण्यात आले. पुरुषांच्या ट्रायथलॉनमध्ये (Triathlon) पहिल्या दिवशी इंग्लंडच्या अॅलेक्स यीने (Alex Yee) सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अॅलेक्स या स्पर्धेत सुवर्णपदकाला अगदी जवळून मुकला होता. त्याने रोप्यपदक हस्तगत केलं होते. 24 वर्षीय अॅलेक्सने ट्रायथलॉन शर्यत पूर्ण करण्यासाठी 50 मिनिटे 34 सेकंद घेतले. त्याने आपला प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या हेडन वाइल्डचा (Hayden Wilde) 13 सेकंदांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हाऊसर तिसर्या स्थानावर असताना त्याने ट्रायथलॉन 50 मिनिटे 18 सेकंदात पूर्ण केली.
न्यूझीलंडच्या हेडनला ही शर्यत जिंकता आली असती पण 10 सेकंदाच्या पेनल्टीमुळे तो अॅलेक्सच्या मागे पडला. ट्रायथलॉनमध्ये तीन स्पर्धा आहेत. यामध्ये खेळाडूंना पोहणे, सायकलिंग आणि धावणे यांमध्ये शर्यत करावी लागते. या तीन शर्यती कमीत कमी वेळेत पूर्ण करणाऱ्या खेळाडूला विजेता घोषित केले जाते. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिलं सुवर्ण जिंकल्यानंतर अॅलेक्सने ही आपली आजपर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे.
🤜🤛
The 𝗳𝗶𝗿𝘀𝘁 medal of the Games goes to @TeamEngland in the men's triathlon! 🥇
Congratulations @Lixsanyee!#B2022 pic.twitter.com/YWjaArA06Z
— Birmingham 2022 (@birminghamcg22) July 29, 2022
एखाद्या मोठ्या क्रीडा स्पर्धेत आई-वडिलांसमोर धावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, मी खूप आनंदी आहे, ही माझी पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आहे. मला या शर्यतीत शक्य तितके शांत राहायचे होते आणि इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करायचे होते. आता या पदावर पोहोचण्यासाठी मी खूप भाग्यवान समजतो. हेही वाचा Commonwealth Games 2022 Day 2 Schedule: आज भारत वि वेल्समध्ये हॉकीचा सामना, 'असे' असेल कॉमनवेल्थ गेम्सच्या दुसऱ्या दिवसाचे वेळापत्रक
कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशी 16 सुवर्ण पदकांसह 48 पदके पणाला लागली होती. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 8 सुवर्णांसह 16 पदके जिंकली होती. ऑस्ट्रेलिया सध्या पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यजमान इंग्लंड 2 सुवर्ण आणि एकूण 9 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.