Canada: अमेरिकेनंतर कॅनडातही हवाई हद्दीत संशयास्पद वस्तू दिसली. अमेरिकेच्या फायटर जेटने हवाई क्षेत्रात घुसून ही उडणारी वस्तू खाली पाडली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी याबाबत खुलासा केला आहे. जस्टिन ट्रूडो यांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्या आदेशानुसार कॅनेडियन हवाई क्षेत्रात एक अज्ञात उडणारी वस्तू खाली पाडण्यात आली. या कारवाईच्या एक आठवडा आधी म्हणजे 4 फेब्रुवारीला अमेरिकेने फायटर जेटद्वारे क्षेपणास्त्राने चिनी गुप्तहेराचा बलून पाडला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ट्विट केले की, मी कॅनडाच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करणाऱ्या एका अज्ञात वस्तूला खाली पाडण्याचे आदेश दिले. जस्टिन ट्रूडो म्हणाले की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी ताज्या घुसखोरीबाबत चर्चा केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)