उत्तर चीनच्या काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अचानक आलेल्या पुराच्या वेळी अधिकाऱ्यांनी लोकांना घरात राहण्याचा इशारा दिला आहे. वृत्तानुसार, पुरामुळे बससेवाही बंद करण्यात आली आहे. वादळ गाड्या वाहून जात आहे आणि अनेक भुयारी रेल्वे स्थानकांना पूराचे पाणी शिरले आहे. वादळाचे अनेक व्हिडिओ ऑनलाइन समोर आले आहेत, ज्यात विनाशकारी पूर दिसत आहे. बीजिंगच्या पश्चिमेकडील मेंटौगु जिल्ह्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
Two days torrential rains have triggered flash floods in MeiTouGou district, west of Beijing.
Stay inside and keep safe! pic.twitter.com/1eJWft5HrP
— China in Pictures (@tongbingxue) July 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)