Electricity Theft: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका तीन वर्षांच्या मुलावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेशावर इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी (PESCO) आणि पाणी आणि ऊर्जा विकास प्राधिकरण (WAPDA) यांच्या तक्रारींवरून, वीज चोरीच्या आरोपाखाली अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पुढे या मुलाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयासमोरही उभे करण्यात आले. न्यायाधीशांनी या खटला फेटाळला. न्यायालयाने असेही नोंदवले की, तक्रारदार कथित गुन्ह्याशी मुलाच्या संबंधाबाबत अनिश्चित आहेत. ही घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली आहे. पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी (DISCOs) मधील वीजचोरीमुळे राष्ट्रीय तिजोरीचे पाकिस्तानी 438 अब्जांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (हेही वाचा: ब्रिटनमधील स्क्रॅप मेटल फर्मच्या भारतीय वंशाच्या संचालकाला रेल्वे ट्रॅक चोरीप्रकरणी तुरुंगवास)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)