केनियातील काकामेगा येथील अनेक विद्यार्थ्यांना एका गूढ आजाराने ग्रासले आहे. वरवर पाहता या आजाराची लक्षणे अर्धांगवायू प्रमाणे दिसत आहेत. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या शरीरातील त्राण निघून गेल्यासारखे वाटत आहे. विद्यार्थी गुडगेदुखीने ग्रासले आहेत. काही विद्यार्थ्यांना आपला तोलही सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. हा प्रकार एरेगी गर्ल्स हायस्कूलमध्ये घडल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारानंतर काही पालकांनी शाळा बंद ठेवण्याची मागणी केली. मात्र, शाळा प्रशासनाने त्यास नकार देत, केवळ पीडित विद्यार्थ्यांना शाळेतून सुट्टी दिली जाईल. बाकीचे वर्ग नियमीत सुरु राहतील असे सांगितले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)