साधारणतः 5 महिन्यांपूर्वी नेपाळ सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विवाह कायदेशीर ठरवल्यानंतर, देशात बुधवारी औपचारिकपणे समलैंगिक विवाहाची नोंदणी करण्यात आली. असे करणारा नेपाळ हा पहिला दक्षिण आशियाई देश बनला आहे. ट्रान्स-वुमन माया गुरुंग, 35 आणि समलिंगी सुरेंद्र पांडे, 27, यांचे कायदेशीर लग्न झाले. यांच्या लग्नाची नोंदणी पश्चिम नेपाळमधील लामजुंग जिल्ह्यातील दोर्डी ग्रामीण नगरपालिकेत झाली. ब्लू डायमंड सोसायटीचे अध्यक्ष संजीब गुरुंग यांनी याबाबत माहिती दिली. ही संस्था नेपाळमधील लैंगिक अल्पसंख्याकांच्या हक्क आणि कल्याणासाठी काम करते. याआधी 2007 मध्ये नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला परवानगी दिली होती. पुढे 2015 मध्ये स्वीकारलेल्या नेपाळच्या राज्यघटनेतही लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे. 27 जून 2023 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने गुरुंगसह अनेक लोकांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत नेपाळमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर करण्याचा अंतरिम आदेश जारी केला. (हेही वाचा: Same-Sex Marriage: भारतात समलैंगिक विवाहासंदर्भात काय आहे कायदा? केंद्र सरकार का करत आहे विरोध? जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)