सोमवारी न्यूयॉर्कमधील लॉकपोर्टमधील गुहेच्या फेरफटकादरम्यान एक बोट उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या बोटीवर 36 प्रवासी होते. सध्या अनेक आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळावर आहेत. गुहेच्या आत एक टूर बोट उलटल्यानंतर आपत्कालीन कर्मचारी अनेक प्रवाशांना वाचवण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहेत. आतापर्यंत 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. टूर बोट नेमकी कशामुळे पलटी झाली याचे कारण सध्या अस्पष्ट आहे. बचाव वाहने आणि कर्मचारी यांच्यासाठी जागा तयार करण्यासाठी आजूबाजूचे जवळपासचे रस्ते बंद करण्यात आले होते.
दरम्यान, लॉकपोर्ट गुहा एरी कालव्यावर आहे, ती न्यूयॉर्कच्या वरच्या भागातील नायगारा फॉल्सपासून फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. लॉकपोर्ट गुहा आणि अंडरग्राउंड बोट राइड ही एक ‘अद्वितीय आणि गूढ’ राइड असल्याचा दावा केला जातो. ही अमेरिकेतील सर्वात लांब भूमिगत बोट राइडपैकी एक आहे. (हेही वाचा: काय सांगता? अमेझॉनच्या जंगलात घडला चमत्कार; कोलंबिया विमान अपघातानंतर 40 दिवसांनंतर 4 मुले जिवंत सापडली, एक फक्त 1 वर्षांचा)
🚨#BREAKING: Dozens of People in Water after tour Boat Capsizes Inside Lockport Caves with 36 passengers Onboard
Currently multiple emergency personnels are on scene in Lockport Cave New York After a tour boat capsized inside the cave, and emergency… pic.twitter.com/3yUsqiLOyu
— R A W S A L E R T S (@rawsalerts) June 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)