Iraq Blasts: इराकच्या अर्ध स्वायत्त कुर्दिश प्रदेश येथील इरबिल मधील यूएस वाजिण्य दुतावासाजवळ क्षेपणास्त्रे आदळल्यानंतर काही वेळातच गुप्तचर मुख्यालय आणि इराणी विरोधी दहशतवादी गटांवर हल्ले झाले. कुर्दिश प्रादेशिक सरकारच्या सुरक्षा परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की या हल्ल्यांमध्ये चार नागरिक ठार झाले आणि सहा जखमी झाले.  इरबिलच्या बॉम्बस्फोटात कोणतेही युती किंवा अमेरिकन सैन्य मारले गेले नाही. हा हल्ला सोमवारी झाल्याची माहिती मिळाली, या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये कोणतेही अमेरिकन नव्हते आणि यूएस सुविधांवर परिणाम झाला नाही अशी माहिती रॉयटर्स वृत्तांनी दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)