यंदा भारतीय वेळेनुसार, 20 एप्रिल 2023 रोजी, सकाळी 7.04 वाजलेपासून वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू होईल. हे सूर्यग्रहण दुपारी 12.29 पर्यंत चालेल. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटांचा असेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे देशात सुतक काळही वैध असणार नाही. हे सूर्यग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, बरुनी, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, तैवान, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण पॅसिफिक महासागर, न्यूझीलंड, दक्षिण हिंद महासागरात दिसणार आहे.

यावेळचे सूर्यग्रहण महत्त्वाचे मानले जाते कारण या दिवशी वैशाख महिन्यातील अमावस्या देखील आहे. या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. अशा स्थितीत सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. भारतामध्ये जरी तुम्ही हे सूर्य ग्रहण पाहू शकणार नसलात तरी, इंटरनेटच्या सहाय्याने याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

पहा सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)