Moon Drifting Away: चंद्र आपल्या पृथ्वीपासून दूर जात असल्याचा दावा एका वैज्ञानिक अभ्यासात करण्यात आला आहे. तो दरवर्षी सुमारे 3.8 सेंटीमीटर वेगाने दूर जात आहे. चंद्राची हीच प्रवृत्ती कायम राहिल्यास पृथ्वीवर 25 तासांचा दिवस असेल. शास्त्रज्ञांनी असाही दावा केला आहे की, पृथ्वीवर पूर्वी एक दिवस हा 18 तासांपेक्षा थोडा जास्त असायचा. चंद्र दूर जाण्याने पृथ्वीवरील जीवनाच्या अस्तित्वावर अनेक दूरगामी परिणाम होऊ शकतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, चंद्राच्या पृथ्वीपासून दूर जाण्याचा वेग अजूनही तुलनेने कमी आहे, परंतु भूवैज्ञानिक घटना, पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग आणि इतर खंडीय घटनांमुळे तो वेळोवेळी बदलत आहे.
विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाच्या (University of Wisconsin-Madison) एका चमूने पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रामध्ये होत असलेल्या बदलांचा एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी 3.8 सेंटीमीटर वेगाने दूर जात आहे. याचा पृथ्वीवरील दिवसांच्या लांबीवर लक्षणीय परिणाम होईल. जर हा ट्रेंड चालू राहिला तर पृथ्वीवरील एक दिवस 25 तासांपर्यंत असू शकतो. शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, सुमारे 1.4 अब्ज वर्षांपूर्वी, पृथ्वीवरील एक दिवस 18 तासांपेक्षा थोडा जास्त होता. (हेही वाचा: Dark Comets Hidden Threats: 'डार्क धूमकेतू', पृथ्वीसाठी ठरु शकतात मानवी कल्पनेपेक्षाही अधिक धोकादायक)
पहा पोस्ट-
Moon Drifting Away, Earth Could Have 25 Hours In A Day: Study https://t.co/3Vh55WcQIt pic.twitter.com/y1F1JTuFIz
— NDTV (@ndtv) August 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)