Modi Govt Notice to X, YouTube, Telegram: इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब आणि टेलिग्राम यांना नोटीस जारी केली आहे. केंद्र सरकारने या माध्यमांना भारतीय इंटरनेटवरील त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून कोणत्याही प्रकारचे बाल लैंगिक अत्याचार साहित्य (CSAM) काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. हे न केल्यास कारवाईला सामोरे जा, अशी चेतावणीही मोदी सरकारने या प्लॅटफॉर्मंना दिली आहे. या प्लॅटफॉर्मना देण्यात आलेल्या सूचना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही CSAM मधील प्रवेश त्वरित आणि कायमस्वरूपी काढून टाकण्याच्या किंवा अक्षम करण्याच्या महत्त्वावर भर देतात. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, आम्ही X, YouTube आणि Telegram ला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणतेही बाल लैंगिक शोषण साहित्य नसल्याची खात्री करण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. आयटी नियमांनुसार सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेट तयार करण्याचा सरकारचा निर्धार आहे.
Govt issues notices to X, YouTube, Telegram to remove child sexual abuse material from their platforms in India: Statement
— Press Trust of India (@PTI_News) October 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)