भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स पॉवर हाऊस बनवण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांगीण दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, भारताला जगाची दुरुस्ती राजधानी बनवण्यासाठी काही परिवर्तनात्मक धोरण आणि प्रक्रिया बदलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी सरकारने बुधवारी इलेक्ट्रॉनिक्स रिपेअर सर्व्हिसेस आउटसोर्सिंग (ERSO) पायलट उपक्रम सुरू केला आहे.

हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनशी सुसंगत असून या उपक्रमामुळे भारत जागतिक इलेक्ट्रॉनिक्स महासत्ता बनण्याच्या मार्गावर पुढे जाईल. भारताने काही अनुकूल धोरणात्मक बदलांसह स्वतःला इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी एक पायलट प्रकल्प सुरू केला आहे. ज्याद्वारे आधीच लेनोवो आणि फ्लेक्स सारख्या कंपन्यांना आकर्षित केले गेले आहे. देशाच्या आयटी मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)